शिवाजी चौक, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली
vishwasevasankul@gmail.com
+91 9822765673 / 9970104052
School Campus Training
आमच्याबद्दल (About Us)

विश्वसेवा विद्यामंदिर, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा

आमच्या संस्थेत निसर्गरम्य व आरोग्यदायी शालैय परिसर असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व नैतिक गुणांचा विकास करण्यावर आमचा भर आहे.

अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अद्ययावत ग्रंथालय ही आमची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आम्ही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासासाठी विविध उपक्रम राबवतो.

निवासी शाळा सुविधा
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
क्रीडा व कुस्ती प्रशिक्षण
बौद्धिक व नैतिक विकास
आमची वैशिष्ट्ये आणि नियम

शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि निवासी नियमावली

शाळेची वैशिष्ट्ये

  • निसर्गरम्य व आरोग्यदायी शालेय व वसतिगृह परिसर
  • महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम व तज्ञ मार्गदर्शकांकडून तयारी
  • संगीत, नृत्य, गायन व आधुनिकतेबरोबरच सांस्कृतिक प्रकल्प
  • सुसज्ज संगणक कक्ष, प्रयोगशाळा व ग्रंथालय
  • खेळाचे प्रशस्त मैदान: कुस्ती, मल्लखांब, धनुर्विद्या, तायक्वांदो प्रशिक्षण
  • इ. १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुणांची सवलत
  • वक्तृत्वातून नेतृत्व घडविण्यासाठी विशेष मार्गदर्शन

निवासी विद्यार्थ्यांकरिता नियमावली

१) महिन्यातून एक दिवस पालक भेट असेल.


२) पालक भेटीव्यतिरिक्त पाल्यास भेटता येणार नाही.


३) भेटीची वेळ: सकाळी ९ ते सायं. ६ अशी राहील.


४) पाल्याजवळ खाऊ, पैसे व मौल्यवान वस्तू ठेवता येणार नाहीत.


५) शैक्षणिक फी दिलेल्या मुदतीत भरून पूर्ण करावी.


६) शिस्त मोडल्यास अगर गैरवर्तन केल्यास प्रवेश रद्द केला जाईल.


७) पालकांनी पाल्याची आरोग्य माहिती अगोदर द्यावी.